Posts

लहान मुलांच्या खाण्याच्या हेल्दी सवयी लावण्यासाठी 4 महत्त्वाच्या टिप्स

Image
आजच्या बदलत्या जीवनशैलीनुसार लहान मुलांना चॉकलेट, बेकरी प्रॉडक्ट, कॅडबरी, आइस्क्रीम अशा गोड पदार्थ खाण्याच्या सवयी खूप लागतात. आणि मुले एवढी त्या पदार्थांच्या आहारी जातात की एखाद्या वेळेस जर त्यांना ते पदार्थ मिळाले नाही तर रडून उपाशी राहतात. यासाठीच आधी त्यांना त्या पदार्थांची सवय लावून न देणे हा एकच पर्याय असतो. एखाद्या वेळेस आपण हे पदार्थ दिले तरी चालेल, पण सारखे सारखे देणे म्हणजे, आपण त्यांच्या सवयींना खतपाणी घालत असतो,आणि नकळतपणे त्यांच्या आरोग्याची हेळसांड करत असतो. याची या मुलांच्या आई-वडिलांना जाणीवच होत नाही, आणि जेव्हा जाणीव होते तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते. मी मधुरा आंबेकर न्यूट्रिशनिस्ट आणि नॅचरलफिटनेसएक्सपर्ट Madhura's Fitness Motivation चैनल ची निर्माती.मला  डिसेंबर 2022 पर्यंत 10000 लोकांच्या फिटनेसमध्ये सकारात्मक बदल घडवून आणायचे आहेत. बदलत्या जीवनशैलीनुसार लहान मुलांच्या खाण्याच्या हेल्दी सवयी कशाप्रकारे लावू शकतो, हे मी  सांगणार आहे, त्यासाठी हा ब्लॉग पूर्ण वाचा.   तर मग चला जाणून घेऊया.... परिपूर्ण संतुलित आहार देणे  लहान मुलांमध्ये पोषणतत्वांच...

तरुणांनी शारीरिक आणि मानसिक गरज म्हणून योग करण्याचे महत्त्व

Image
  इंटरनॅशनल योग दिवस साजरा झाला. या एका दिवसाने आज बहुतेक जणांनी योगा केला असेल खूपच छान सुरुवात तुम्ही आज केली.आज तुम्हाला जाणवले ही असेल की एक दिवस योग करून तुम्हाला खूप छान काम केल्याची जाणीव झाली असेल, किंवा मन शांत झाले असेल, अशीच सुरुवात तुम्ही रोजच्या दिवसात थोडासा वेळ काढून स्वतःच्या शरीरासाठी केली पाहिजे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढणे अशक्य झाले आहे. आणि त्यामध्ये तर अशक्य असे स्वतःच्या शरीरासाठी वेळ काढायला लोकांना वेळ नसतो, पण हे तेव्हा समजते जेव्हा वेळ आपल्या हातातून निघून गेलेली असते. किंवा शरीराला कोणत्याही आजार झाला की व्यक्ती आपल्या शरीरासाठी थोडाफार वेळ काढते. नमस्कार मी मधुरा आंबेकर न्यूट्रिशनिस्ट आणि नॅचरल फिटनेस एक्सपर्ट Madhura's Fitness Motivation चैनल ची निर्माती.मला  डिसेंबर 2025 पर्यंत 10000 लोकांच्या फिटनेसमध्ये सकारात्मक बदल घडवून आणायचे आहेत.मी आजची शारीरिक आणि मानसिक गरज म्हणून तरुणांनी योग का करायला पाहिजे याचे महत्व सांगणार आहे, त्यासाठी हा ब्लॉग पूर्ण वाचा.   तर मग चला जाणून घेऊया....   प्राचीन काळापासून भारत...
  👉  लॉकडाऊन मधला व्यायाम  पुन्हा एकदा लॉकडाऊन चालू झाले जिम फिटनेस सेंटर बंद झाल्या. आता व्यायाम कसा करणार, कोरोना काळात खरेतर व्यायामाची आणि प्राणायाम करण्याची खूप आवश्यकता आहे. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी व्यायाम हा नियमित करावाच लागतो. लॉकडाऊन मध्ये तुम्ही दिवसभर लोळत टीव्ही बघत वेळ घालवू नका, जेवढ्या वेळा तुम्ही शारीरिक हालचाली कराल तेवढे तुम्ही कॅलरी बर्न कराल, नाहीतर दिवस बसून घालवायचा आणि जेवण  मात्र नेहमीप्रमाणे त्यामुळे तुम्ही जास्त फॅटी बनवत जाल. गेल्यावर्षी जेव्हा लॉकडाऊन झाला तेव्हाही लोकांची वजने खूप वाढली होती, त्याचे कारण हेच होते, त्यासाठी तुम्ही दिवसभरातील छोटी-मोठी कामे स्वतः करा. प्रत्येक गोष्टीसाठी लहान मुलांना वाकू नका एखादी छोटी वस्तू आणायची असेल तर घरच्या लहान मुलांना सांगतो ते न सांगता स्वतः उठून ती वस्तू आणा व स्वतः ती जागेवर ठेवा. जर बिल्डींग मध्ये लिफ्ट असेल, तर जिन्याचा वापर करा. घरातील लहान-मोठी कामे तर बायकांना करायला लागतात, पण जर तुम्ही घरात कामे करत नसाल तर, घरातील छोटी-मोठी कामे करा घरच्या माणसांना मदत करून  तुम्ही ॲक्टिव राहाल ...

गुढीपाडव्या मधील कडूलिंबा चे महत्व

 गुढीपाडवालिंबाचे महत्त्व  गुढीपाडवा मराठी नववर्षाची सुरुवात म्हणून साजरी करतात. वसंत ऋतूची सुरुवात आणि निसर्गामध्ये झाडांना नव्याने पालवी फुटायला आणि पुन्हा नव्याने सजायला सुरु वात होत असते.गुढीपाडव्यादिवशी कडुलिंबाचे सेवन केले जाते. त्यामध्ये आयुर्वेदाचे आणि विज्ञानाचे खूप मोठे सामर्थ्य दिसून येते. कडुलिंबाला संस्कृत मध्ये "अरिष्ट" असे म्हणतात अरिष्ट म्हणजे कधी नष्ट न होणारे. भारतामध्ये या आयुर्वेदिक वनस्पती चा वापर खूप पूर्वीपासूनच करण्यात येतो त्या झाडांच्या फक्त पानांचा वापर नाही तर ,आयुर्वेद मध्ये पाने ,फुले, बिया, मुळे या सर्वांचा औषधी म्हणून वापर होत असतो.  कडू लिंबाचे पूर्ण झाड हे गुणकारी आहे. कडूलिंबा मध्ये 130 वेगवेगळ्या प्रकारची जैव संयुगे असतात, जे शरीराला व्याधींपासून मुक्ती देतात. वसंत ऋतूची सुरुवात होत असताना, दोन ऋतूंमध्ये जेव्हा बदल होतो, तेव्हा शरीरामध्ये आजार आणि kuf निर्मिती होते त्यावर उपाय म्हणून कडुलिंबाचा पाला खाल्ला जातो. वातावरणामध्ये एका ऋतू मधून दुसऱ्या ऋतूमध्ये बदल होतात, त्यावेळी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते ,त्यावेळेस कडूलिंबाचा वापर...

निसर्गाची किमया आणि........

Image
 निसर्गाची किमया आणि नारळात पाणी खरंच कसे आले ते पाणी ? नारळ पाण्याचा आपल्या शरीरासाठी होणारे फायदे हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही.नारळ पाण्यात कित्येक पोषक तत्वांचा चांगला स्त्रोत आहे.अँटीऑक्सिडंट असते.मूत्रपिंडातील निर्माण होणार दगड रोखण्यास मदत करते.हृदयाचे आरोग्य सुधारते रक्तदाब कमी करते .दीर्घ व्यायामानंतर फायदेशीर असतो. नारळाच्या झाडांमध्ये प्रत्येक भागाचा पाने ,फळ माणसांना खूपच उपयोग होत असतो म्हणूनच त्याला कल्पवृक्ष म्हणतात. पण हे झाले नारळाचे निसर्गामध्ये अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्याचा आपण कधी विचारही करत नाही, जेव्हा न्यूट्रिशनिस्ट म्हणून आम्हाला प्रत्येक फळांचे भाज्यांचे आपल्या शरीराला होणारा उपयोग हे अभ्यासताना खूप कठीण आणि आठवायला त्रासदायक असायचे. हीच गोष्ट निसर्गाने अगदी खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे पण कधी विचार केलाय का, पूर्वीच्या काळी असे कॅलरीज मापायचे चार्ट होते का त्याप्रमाणे लोक डायट करायचे का आणि एवढे करूनही त्यांचे आयुष्यमान दीर्घ होते त्याचे कारण हे फक्त निसर्ग. माणसांच्या बुद्धीच्या पलीकडे निसर्गाने आपल्याला भरपूर दिले आहे तेही अगदी न मागता ...

मेकअप शिवाय नैसर्गिक सौंदर्य मिळवा

Image
  रीना थोडीशी सावळी तरीही रेखीव होती. ती सतत आपल्या दुसऱ्या गोर्‍या मैत्रिणीशी तुलना करून स्वत:वर सारखा मेकअप करून सुंदर दिसण्याचा प्रयत्न करायची,पण हे सौंदर्य फक्त तीन ते चार तास राहायचे,नंतर ती पुन्हा तिला पहिल्या प्रमाणेच वाटायचे. स्वत:वर सारखा मेकअप करून तिने तिची स्कीन खराब करून घेतली होती, तिची त्वचा मेकअप मधील केमिकलमुळे काळवंडली होती. तिला आता मेकअप करण्यात देखील तिटकारा वाटू लागला..  खरंच आहे मैत्रिणींनो नुसता वरून मेकअप करून तुम्ही सुंदर तर नाही बनत तो एक खोटा मुखवटा थोड्या वेळा पुरता मर्यादित असतो.मेकअप मध्ये असणाऱ्या घातक केमिकल मुळे असलेली सुंदर त्वचा निस्तेज बनते हे मात्र नक्की.  मी मधुरा आंबेकर ..न्यूट्रिशनिस्ट & नॅचरल फिटनेस एक्सपर्ट डिसेंबर 2022 पर्यंत दहा हजार लोकांच्या फिटनेस मध्ये सकारात्मक बदल घडवून आणायचे आहेत.आज मी तुम्हाला मेकअप शिवाय आपल्याला नैसर्गिक सौंदर्य कसे मिळू शकते.. त्याच्या महत्त्वाच्या चार टिप्स सांगणार आहे त्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.   योग्य आहार-  एक निरोगी आणि चमकणारी त्वचा ही आपल्या आहाराबद्दल बरंच काही सांगून ज...

2021... नवीन वर्षात शरीराचे आरोग्य हीच खरी संपत्ती.

Image
  2021 ...Health is Wealth तुम्हाला माहिती आहे का ? आपल्यासाठी  सर्वात मौल्यवान गोष्ट काय आहे ? 2020 मध्ये  covid-19 हे पूर्ण जगाला दाखवून दिले आहे की आपल्या शरीराचे आरोग्यहीच खरी संपत्ती आहे. हेच जगण्यासाठी महत्वाचे आहे. मी मधुरा आंबेकर ....न्यूट्रिशनिस्ट & नॅचरल फिटनेस एक्सपर्ट मला येत्या डिसेंबर 2021 पर्यंत 10,000 लोकांच्या फिटनेसमध्ये सकारात्मक बदल घडवून आणायचे आहेत. आज मी तुम्हाला सांगणार आहे की, 2021 मध्ये आपले शरीर महत्त्वाचे मौल्यवान आहे. त्यासाठी वेगळे काम करण्याची खूपच गरज आहे. पैसे कमवण्यासाठी  आपण  वयाची  5 ते 25 वर्ष शिक्षण घेत असतो.स्वताला  त्यासाठी  तयार करत असतो. पण आपण आपल्या शरीरासाठी  जे  आपल्याला  फुकट मिळालेले  आहे. त्याची आपण लहानपणापासून  विशेष अशी  काळजी घेत नसत., कारण  जे आपल्याला  फुकट मिळते  त्याची  किंमत  आपण करत नसतो. आपल्या शरीराची काळजी घ्या हे एकच ठिकाण आहे जिथे तुम्हाला राहायचे आहे. एखादा माणूस ठरवतो कि माझे मासिक उत्पन्न 1,00,000 झाल्यावर मी जगातील सर्वात ...