तरुणांनी शारीरिक आणि मानसिक गरज म्हणून योग करण्याचे महत्त्व

 


इंटरनॅशनल योग दिवस साजरा झाला. या एका दिवसाने आज बहुतेक जणांनी योगा केला असेल खूपच छान सुरुवात तुम्ही आज केली.आज तुम्हाला जाणवले ही असेल की एक दिवस योग करून तुम्हाला खूप छान काम केल्याची जाणीव झाली असेल, किंवा मन शांत झाले असेल, अशीच सुरुवात तुम्ही रोजच्या दिवसात थोडासा वेळ काढून स्वतःच्या शरीरासाठी केली पाहिजे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढणे अशक्य झाले आहे. आणि त्यामध्ये तर अशक्य असे स्वतःच्या शरीरासाठी वेळ काढायला लोकांना वेळ नसतो, पण हे तेव्हा समजते जेव्हा वेळ आपल्या हातातून निघून गेलेली असते. किंवा शरीराला कोणत्याही आजार झाला की व्यक्ती आपल्या शरीरासाठी थोडाफार वेळ काढते.

नमस्कार मी मधुरा आंबेकर न्यूट्रिशनिस्ट आणि नॅचरल फिटनेस एक्सपर्ट Madhura's Fitness Motivation चैनल ची निर्माती.मला  डिसेंबर 2025 पर्यंत 10000 लोकांच्या फिटनेसमध्ये सकारात्मक बदल घडवून आणायचे आहेत.मी आजची शारीरिक आणि मानसिक गरज म्हणून तरुणांनी योग का करायला पाहिजे याचे महत्व सांगणार आहे, त्यासाठी हा ब्लॉग पूर्ण वाचा.

 तर मग चला जाणून घेऊया....


  प्राचीन काळापासून भारतामध्ये योगाचे महत्त्व आहे योग म्हणजे एकत्र येणे योग हा शब्द संस्कृत मधून आला आहे. पूर्वीच्या संत महाराज यांनीदेखील आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग योग मध्ये द्यायचे, आणि त्याच प्रमाणे त्यांचे वागणे-बोलणे असायचे परंतु आता तरुणाईमध्ये योग करणे म्हणजे कठीण विषय किंवा कंटाळवाणा विषय समजतात. योग फक्त वयस्कर लोक किंवा संन्यासी लोक यांसाठी असतो, असे समज झालेला दिसतो. त्यामुळे विशेष तरुण मुले योग करत नाहीत. पण आता योग चे महत्व पूर्ण दुनिया ने मान्य केले आहे, त्याला  तुम्ही न करता पूर्वीपासून चालत आलेल्या भारतीय संस्कृतीचा आणि त्यापासून असणाऱ्या फायद्यापासून तुम्ही वंचित राहू शकता हे मात्र नक्की.

योग कोणत्याही वयात सुरुवात करू शकतो


 कोणत्याही वयाची व्यक्ती योग करू शकते सर्व वयोगटातील लोकांसाठी योग योग्य आहे. कारण यामध्ये कोणत्याही आसनाची अंतिम स्थिती ही लगेच अपेक्षित नसते आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या वयानुसार आणि कार्य क्षमतेप्रमाणे त्यामध्ये हळूहळू सुधारणा करू शकतात. आणि महत्त्वाचा म्हणजे यामध्ये झाले तर फायदे होतात नुकसान होत नाही.

अभ्यासामध्ये एकाग्रता वाढविण्यासाठी 


योग मधील सर्व आसने करताना पूर्ण लक्षपूर्वक करणे गरजेचे असते.आसने करताना प्रत्येक श्वासाचे मनातल्या मनात मोजणे चालू असते. जे इतर कोणत्याही एक्सरसाइज मध्ये दिसून येत नाही. त्यामुळे तुमची एकाग्रता साधते. जे तुम्हाला अभ्यासामध्ये ही एकाग्रता साधण्यासाठी खूप मदत होते. एकाग्रता ही प्रत्येक तरुण वर्गासाठी खूपच महत्वाचे असते शालेय जीवनापासून ते अगदी नोकरी धंदे यासाठीदेखील कोणत्याही कामामध्ये एकाग्रता असेल तर व्यक्ती स्वतःमध्ये सुधारणा करत जाते.


शारीरिक आणि मानसिक संतुलन


आजकालच्या धकाधकीच्या जीवनात शरीराचा व्यायाम होईल सुद्धा, पण मनाचा व्यायाम होत नसतो. आणि तो होणे न होणे याचे महत्व सर्वांनाच समजत नाही. स्वतःचे आयुष्यात नुकसान करत असतो. पण खरेतर एक वेळ शरीराचा व्यायाम पेक्षा मनाचा व्यायाम होणे, जसे मनाला शिस्त लावण्यासाठी ध्यान करणे ,प्राणायाम करणे खूप गरजेचे असते. एखादा बलाढ्य शरीराचा माणूस मनाने खूपच कमकुवत असू शकतो जेणेकरून त्याला मन सशक्त करणे त्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.,यासाठी योगा चा व्यायाम शारीरिक आणि मानसिक संतुलन साधण्यासाठी खूप महत्वाचा आहे. योग हा फक्त शरीराच्या बाहेरून काम करत नाही तर तो शरीराच्या आत मध्येही काम करत असतो. जे इतर कोणत्याही व्यायामामध्ये दिसून येत नाही. आज तरुणांमध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून मानसिक तणावाला जातात , त्यासाठी विशेष करून तरुण मुलांनी योग करणे खूपच आवश्यक आहे.


आजारपण दूर ठेवण्यासाठी


  आजची जीवनशैली ही खूपच बदललेली आहे. पूर्वी उतारवयात चे आजार व्यक्तींना व्हायचे ते आता तरुणपणापासूनच किंवा लहान वयातच दिसून येतात, जे खूप भीतीदायक आहे. यासाठी आपली जीवनशैली योग्य असणे महत्त्वाचे असते. यासाठी तुम्ही दररोज योगा, प्राणायाम तुमच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग असायला हवा. योगामुळे अनेक आजारपण दूर राहत असते जसे, हृदय रोग. संधिवात, महिलांचे विविध आजार, लठ्ठपणा, रक्तदाब, झोपेच्या तक्रारी, पोटाचे आजार, अशा कितीतरी आजार आपण आपली फक्त जीवनशैली बदलून कमी करू शकतो. आणि त्याच बरोबर एक महत्त्वाचा भाग आपण काय खातोय याकडे लक्ष दिलेच पाहिजे. योग्य आहार आपल्या जेवणामध्ये असणे गरजेचे आहे. योग शरीर आणि मन विकसित करण्यास मदत करतो परंतु आपण जे काही खात असतो त्याचा प्रभाव आपल्या शरीरावर असतो त्यामुळे संतुलित आहार महत्त्वाचा भाग आहे.

हा ब्लॉग पूर्ण वाचल्याबद्दल मी आपली आभारी आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स मध्ये नक्की विचारू शकता ब्लॉग आवडल्यास कमेंट्स ,शेअर ,लाईक ,नक्की करा, आणि अशाच हेल्दी टिप्स वाचण्यासाठी ,पाहण्यासाठी माझा फेसबुक ग्रुप Madhura's Fitness Motivation नक्की जॉईन करा.

 पुन्हा भेटू धन्यवाद...🙏















Comments

  1. हा ब्लॉग वाचून योग आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवायला पाहिजे...
    असे वाटले... अतिशय सुंदर ब्लॉग लिहिला आहे...!

    ReplyDelete
  2. आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे निमित्त साधून योग साधनेबद्दल खूपच उपयुक्त माहिती दिलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद..

    ReplyDelete
  3. खूपच जबरदस्त ब्लॉग मधुरा.
    मी नक्की रोज योगा करेन.

    ReplyDelete
  4. छान माहितीपूर्ण मार्गदर्शन

    ReplyDelete
  5. मधुरा लोकांच्या मनात योगा बद्दल जागा निर्माण करण्यासाठी खूप पॉवर्फुल ब्लॉग लिहिलास thanks dear

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

2021... नवीन वर्षात शरीराचे आरोग्य हीच खरी संपत्ती.

Covid-19-Powerfull 5 steps to boost your immunity in 21 days

निसर्गाची किमया आणि........