मेकअप शिवाय नैसर्गिक सौंदर्य मिळवा

 


रीना थोडीशी सावळी तरीही रेखीव होती. ती सतत आपल्या दुसऱ्या गोर्‍या मैत्रिणीशी तुलना करून स्वत:वर सारखा मेकअप करून सुंदर दिसण्याचा प्रयत्न करायची,पण हे सौंदर्य फक्त तीन ते चार तास राहायचे,नंतर ती पुन्हा तिला पहिल्या प्रमाणेच वाटायचे. स्वत:वर सारखा मेकअप करून तिने तिची स्कीन खराब करून घेतली होती, तिची त्वचा मेकअप मधील केमिकलमुळे काळवंडली होती. तिला आता मेकअप करण्यात देखील तिटकारा वाटू लागला..

 खरंच आहे मैत्रिणींनो नुसता वरून मेकअप करून तुम्ही सुंदर तर नाही बनत तो एक खोटा मुखवटा थोड्या वेळा पुरता मर्यादित असतो.मेकअप मध्ये असणाऱ्या घातक केमिकल मुळे असलेली सुंदर त्वचा निस्तेज बनते हे मात्र नक्की.

 मी मधुरा आंबेकर ..न्यूट्रिशनिस्ट & नॅचरल फिटनेस एक्सपर्ट डिसेंबर 2022 पर्यंत दहा हजार लोकांच्या फिटनेस मध्ये सकारात्मक बदल घडवून आणायचे आहेत.आज मी तुम्हाला मेकअप शिवाय आपल्याला नैसर्गिक सौंदर्य कसे मिळू शकते.. त्याच्या महत्त्वाच्या चार टिप्स सांगणार आहे त्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.

 योग्य आहार- 


एक निरोगी आणि चमकणारी त्वचा ही आपल्या आहाराबद्दल बरंच काही सांगून जाते.आपण जे काही खातो हे त्याचे प्रतिबिंब त्वचेमधून कळते. त्यामुळे शरीर आतून स्वच्छ आणि साफ असणे,त्याची योग्य ती काळजी घेणे ही पहिली महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासाठी तुम्हाला योग्य आहार घ्यायला पाहिजे. हा योग्य प्रथिने, कार्बोहाइड्रेट, फायबर, विटामिन यांनी पोषक असा असावा. जे लोक आहारात प्रक्रिया केलेले तेलकट पदार्थ जास्त खातात त्यांना सतत पिंपल्स ही समस्या निर्माण होते. असे खूप सारे त्वचेचे विकार हे पोटातून निर्माण होत असतात आणि ते लपविण्यासाठी त्यावर केमिकल युक्त मेकअप लावतो जो त्वचेसाठी साठी अपायकारक असतो.

भरपूर पाणी पिणे


काहीजण फक्त तहान लागते तेव्हाच पाणी पितात, त्यामुळे शरीराचे डिहायड्रेशन होऊन त्वचा कोरडी होते, कोरडी त्वचा निस्तेज दिसू लागते, त्यामुळे भरपूर पाणी पिऊन त्वचेला हायड्रेट ठेवा. सतत मेकअपमुळे त्वचा हायड्रेट होत नाही.शिवाय उन्हाळ्यात तहान लागली की साखरयुक्त पेय पिण्याचे टाळा त्या ठिकाणी तुम्ही पाणी किंवा ग्रीन टी चा आनंद घ्या जे तुम्हाला एंटीऑक्सीडेंट मिळवून देते.

दररोज व्यायाम करा


 

दररोज व्यायाम केल्याने आपल्या शरीरातून घाम निघून त्वचेमधील रोमछिद्रे मोकळी होतात,त्वचेला ऑक्सिजन पुरवठा होतो ज्याने त्वचा निरोगी राहते. व्यायामामुळे त्वचेला चमकदार दिसणारे नवीन कोशिका पेशींना उत्तेजन मिळते. सतत मेकअप ठेवल्यामुळे  त्वचेवरील रोमछिद्र बंद असतात ज्याने पिंपल्सची समस्या निर्माण होते. शिवाय योग्य व्यायामामुळे आपले वजन योग्य राहते जे सौंदर्य अजून वाढवते.

त्वचेची काळजी घ्या


 

उन्हातून बाहेर फिरताना त्वचेवर होणारा हानिकारक किरणांपासून संरक्षण मिळण्यासाठी बाहेर फिरताना सनस्क्रीन लोशन दररोज लावा. स्कार्फ चा वापर चेहऱ्यावर करा. उन्हामध्ये जाताना पूर्ण शरीर झाकणारे कपडे वापरा.हानिकारक फेसपॅक लावण्यापेक्षा निसर्गामध्ये अशा कितीतरी गोष्टी आहेत, ज्या नैसर्गिक सौंदर्य देतात जसे संत्री ,आवळा ,पपई, मुलतानी माती  त्यांच्या सततच्या वापराने तुमच्या त्वचेला नैसर्गिक सौंदर्य मिळते. 

हा ब्लॉग पूर्ण वाचल्याबद्दल मी आभारी आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता.ब्लॉग आवडल्यास लाईक, कमेंट्स, शेअर नक्की करा. आणि अशाच हेल्दी टिप्स वाचण्यासाठी  आणि पाहण्यासाठी माझा फेसबूक ग्रुप Madhura's Fitness Motivation जॉईन करा.

पुन्हा भेटू धन्यवाद.....

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

2021... नवीन वर्षात शरीराचे आरोग्य हीच खरी संपत्ती.

Covid-19-Powerfull 5 steps to boost your immunity in 21 days

निसर्गाची किमया आणि........