2021... नवीन वर्षात शरीराचे आरोग्य हीच खरी संपत्ती.

 


2021 ...Health is Wealth

तुम्हाला माहिती आहे का ? आपल्यासाठी  सर्वात मौल्यवान गोष्ट काय आहे ? 2020 मध्ये  covid-19 हे पूर्ण जगाला दाखवून दिले आहे की आपल्या शरीराचे आरोग्यहीच खरी संपत्ती आहे. हेच जगण्यासाठी महत्वाचे आहे.

मी मधुरा आंबेकर....न्यूट्रिशनिस्ट & नॅचरल फिटनेस एक्सपर्ट मला येत्या डिसेंबर 2021 पर्यंत 10,000 लोकांच्या फिटनेसमध्ये सकारात्मक बदल घडवून आणायचे आहेत. आज मी तुम्हाला सांगणार आहे की, 2021 मध्ये आपले शरीर महत्त्वाचे मौल्यवान आहे. त्यासाठी वेगळे काम करण्याची खूपच गरज आहे.

पैसे कमवण्यासाठी  आपण  वयाची  5 ते 25 वर्ष शिक्षण घेत असतो.स्वताला  त्यासाठी  तयार करत असतो. पण आपण आपल्या शरीरासाठी  जे  आपल्याला  फुकट मिळालेले  आहे. त्याची आपण लहानपणापासून  विशेष अशी  काळजी घेत नसत., कारण  जे आपल्याला  फुकट मिळते  त्याची  किंमत  आपण करत नसतो. आपल्या शरीराची काळजी घ्या हे एकच ठिकाण आहे जिथे तुम्हाला राहायचे आहे.

एखादा माणूस ठरवतो कि माझे मासिक उत्पन्न 1,00,000 झाल्यावर मी जगातील सर्वात सुखी आणि आनंदी माणूस होईल तर खरच असे असते का? कारण त्याचे मासिक उत्पन्न जेव्हा एक लाख होते तेव्हा त्याची अपेक्षा अजून वाढतात नंतर 2 00,000 -3,00,000...अशी त्याची पैशांची पिशवी भरत असते जस-जसे पैशांची पिशवी जड होते तेव्हा धावणे ही अवघड होते,आजारपण पाठीशी लागतात आणि थोड्या दिवसांनी पैशांची पिशवी खालीच राहते पण तो माणूस मात्र वरती जातो.


आज  काही  प्रश्नांची उत्तरे स्वतःलाच विचारा, आणि विचार करा ....यातील  पहिला प्रश्न आहे.....

1.आपल्यासाठी  जगातील सर्वात मौल्यवान आपले शरीर आहे ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का?

2.जर आपले शरीर मौल्यवान आहे हे आपल्याला माहिती आहे तर आपण त्यासाठी वेगळी असे काही काम करतोय का ?

3.आज पासून पाच वर्षांपूर्वी तुम्ही  जास्त फिट होता की आत्ता आहात?

 ...अर्थातच तुम्ही 5 वर्षापूर्वी जास्त होता जर मग असेल चालत राहिले तर आणखी पाच दहा वर्षांनी तुमचा फिटनेस लेव्हल कसा असणार याचाही विचार करा आणि त्यावर उपाय म्हणून तुम्ही आत्तापासूनच प्रयत्न करायला पाहिजे. स्वतःच्या मनाला या सर्व प्रश्नांची उत्तरे विचारा आणि तुम्हीच ठरवा तुम्हाला काय केले पाहिजे.

माझ्या मते तुम्ही दररोज या 3 गोष्टी स्वतःच्या शरीरासाठी करायलाच पाहिजे....

1.योग्य आहार-


निरोगी राहण्यासाठी आपण जे काही खातो आहे ते फक्त पोट भरण्या पुरता खाऊ नका तर शरीराला योग्य न्यूट्रिशन किती मिळते ते जरूर पहा त्यानुसारच आपला बॅलेन्स आहार ठरवा.

2. व्यायाम-


शरीराला ज्याप्रमाणे चौरस आहाराची ची गरज असते. त्याच प्रमाणे चौरस व्यायामाची गरज असते तुम्हाला जर तुमच्या शरीरावर योग्य असे परिणाम हवे असतील तर आपल्या स्नायूंचा व्यायाम मनाचा व्यायाम यासाठी मेडिटेशन, शरीराला लवचिकपणा येण्यासाठी योगा आणि श्वासांसाठी प्राणायाम अशाप्रकारे वेगवेगळे व्यायाम शिकणे खूप गरजेचे आहे.

3. आराम-


शरीर निरोगी ठेवण्यासाठी शरीराला आराम देणे ही खूप गरजेचे असते यासाठी झोप महत्वाची आहे माणसे कधीही झोपतात कधी उठतात त्यामुळे मनाचे आजार किंवा शरीराचे आजारही निर्माण होतात. 
यासाठी 2021 मध्ये तर मग नवीन वर्षाची सुरुवातआपल्या हेल्दीआरोग्यपूर्ण अशी करणार ना ? वेळेवर झोपणे वेळेवर उठणे हे पहिले ध्येय आपण सर्वांनी करायला पाहिजे.

माझा ब्लॉग पूर्ण वाचल्याबद्दल मी आभारी आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता.ब्लॉग आवडल्यास लाईक, कमेंट्स, शेअर नक्की करा. आणि अशाच हेल्दी टिप्स वाचण्यासाठी  आणि पाहण्यासाठी आणि पाहण्यासाठी माझा फेसबूक ग्रुप Madhura's Fitness Motivation जॉईन करा.

पुन्हा भेटू धन्यवाद.....

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Covid-19-Powerfull 5 steps to boost your immunity in 21 days

निसर्गाची किमया आणि........