गुढीपाडव्या मधील कडूलिंबा चे महत्व
गुढीपाडवालिंबाचे महत्त्व
गुढीपाडवा मराठी नववर्षाची सुरुवात म्हणून साजरी करतात. वसंत ऋतूची सुरुवात आणि निसर्गामध्ये झाडांना नव्याने पालवी फुटायला आणि पुन्हा नव्याने सजायला सुरु वात होत असते.गुढीपाडव्यादिवशी कडुलिंबाचे सेवन केले जाते. त्यामध्ये आयुर्वेदाचे आणि विज्ञानाचे खूप मोठे सामर्थ्य दिसून येते. कडुलिंबाला संस्कृत मध्ये "अरिष्ट" असे म्हणतात अरिष्ट म्हणजे कधी नष्ट न होणारे. भारतामध्ये या आयुर्वेदिक वनस्पती चा वापर खूप पूर्वीपासूनच करण्यात येतो त्या झाडांच्या फक्त पानांचा वापर नाही तर ,आयुर्वेद मध्ये पाने ,फुले, बिया, मुळे या सर्वांचा औषधी म्हणून वापर होत असतो. कडू लिंबाचे पूर्ण झाड हे गुणकारी आहे. कडूलिंबा मध्ये 130 वेगवेगळ्या प्रकारची जैव संयुगे असतात, जे शरीराला व्याधींपासून मुक्ती देतात.
वसंत ऋतूची सुरुवात होत असताना, दोन ऋतूंमध्ये जेव्हा बदल होतो, तेव्हा शरीरामध्ये आजार आणि kuf निर्मिती होते त्यावर उपाय म्हणून कडुलिंबाचा पाला खाल्ला जातो. वातावरणामध्ये एका ऋतू मधून दुसऱ्या ऋतूमध्ये बदल होतात, त्यावेळी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते ,त्यावेळेस कडूलिंबाचा वापर हा खाण्यामध्ये करतात. कडू लिंबाच्या पानामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि खनिजे असतात त्यामुळे हाडे मजबूत करण्यासाठी कडूलिंबाच्या पानाचा उपयोग करतात.त्याशिवाय कडुलिंबाचे तेल हे सांधेदुखी, कंबर दुखी, गुडघेदुखी असेल तर कडुलिंबाच्या तेलाने नियमितपणे मॉलिश केलेली चांगली असते.
याशिवाय कडूलिंबा मध्ये आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे ताकत असते.संसर्गाचे आजार यांच्याशी लढण्याचे सामर्थ्य वाढवते. कडूलिंब हे बुरशीजन्य आजार त्यांना पूर्णपणे बरी करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. कडूलिंबा मध्ये निंवीडोल आणि गेडूनिन औषधी अशी औषधे संयुगे असतात जी बुरशीजन्य आजार नष्ट करतात कडुलिंबाच्या तेलामध्ये आवश्यक fatty ऍसिड असते हे देखील जखम बरी करण्यात आणि चेहरा सुंदर बनवण्यास मदत करतात याशिवाय त्वचारोग साठी कडुलिंबाचा पाला आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ केली जाते. कडुलिंबाची पाने अपचन झाल्यास खातात.
Comments
Post a Comment