निसर्गाची किमया आणि........


 निसर्गाची किमया आणि नारळात पाणी खरंच कसे आले ते पाणी ? नारळ पाण्याचा आपल्या शरीरासाठी होणारे फायदे हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही.नारळ पाण्यात कित्येक पोषक तत्वांचा चांगला स्त्रोत आहे.अँटीऑक्सिडंट असते.मूत्रपिंडातील निर्माण होणार दगड रोखण्यास मदत करते.हृदयाचे आरोग्य सुधारते रक्तदाब कमी करते .दीर्घ व्यायामानंतर फायदेशीर असतो. नारळाच्या झाडांमध्ये प्रत्येक भागाचा पाने ,फळ माणसांना खूपच उपयोग होत असतो म्हणूनच त्याला कल्पवृक्ष म्हणतात. पण हे झाले नारळाचे निसर्गामध्ये अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्याचा आपण कधी विचारही करत नाही, जेव्हा न्यूट्रिशनिस्ट म्हणून आम्हाला प्रत्येक फळांचे भाज्यांचे आपल्या शरीराला होणारा उपयोग हे अभ्यासताना खूप कठीण आणि आठवायला त्रासदायक असायचे. हीच गोष्ट निसर्गाने अगदी खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे पण कधी विचार केलाय का, पूर्वीच्या काळी असे कॅलरीज मापायचे चार्ट होते का त्याप्रमाणे लोक डायट करायचे का आणि एवढे करूनही त्यांचे आयुष्यमान दीर्घ होते त्याचे कारण हे फक्त निसर्ग.

माणसांच्या बुद्धीच्या पलीकडे निसर्गाने आपल्याला भरपूर दिले आहे तेही अगदी न मागता आपण ते घ्यायला कमी पडतो आहे किंवा समजून घेत नाही. आजच्या दुनियेत हाताच्या बोटावर मोजण्याइतकी माणसे सोडून प्रत्येक  माणूस माणुसकी सोडून विसरून पैशांच्या पाठी धावतो आहे.एखादे चांगले काम करतानाही स्वतः चा फायदा बघूनच करत आहेत. पण निसर्गामध्ये असे नाही दिसत निसर्ग हा भरभरून माणसांना देतच असतो कोणत्याही अपेक्षे शिवाय. 

मी मधुरा आंबेकर ..न्यूट्रिशनिस्ट & नॅचरल फिटनेस एक्सपर्ट डिसेंबर 2022 पर्यंत दहा हजार लोकांच्या फिटनेस मध्ये सकारात्मक बदल घडवून आणायचे आहेत.

मी आज तुम्हाला न्यूट्रिशन सोडून हे काय सांगते  आहे असा तुम्ही विचार करत असाल पण त्यामागचे कारण ही तसेच आहे निसर्गाचे अगदी छोटेसे उदाहरण आज मी सांगणार आहे फक्त फळांच्या दिसण्यावरून व आकारावरून आणि रंगावरून हे शरीराच्या कोणत्या अवयवासाठी फायदेशीर असते हे निसर्गच सांगतो आहे कसे ते पहा.


 
बदाम - बदाम हा डोळ्यांच्या आकारासारखा दिसतो मग तो डोळ्यांसाठी खाणे चांगले असते. ते म्हणतात ना बदामी डोळे ते बदामा वरूनच.बदाम डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असतात, हे निसर्ग सांगते आणि न्यूट्रिशन पण हेच सांगते बदामांमध्ये प्रथिने, मॅग्नेशियम,व्हिटॅमिन ई असते. नियमित प्रमाणात व्हिटॅमिन ई सेवन केल्यामुळे वयाशी संबंधित आणि मोतीबिंदू टाळण्यास मदत होते.

 


अक्रोड
- निसर्ग सांगतो की अक्रोड चा आकार हा मानवी मेंदू सारखा दिसतो. स्मरणशक्ती साठी खाने चांगला असतो. आणि न्यूट्रिशन सांगते की अक्रोड हे मेंदूच्या आरोग्यासाठी डीएचएची जास्त प्रमाण आहे, ओमेगा -3 फॅटी ऍसिड चा एक प्रकार आहे. आपल्या मेंदूच्या कार्यक्षमतेस चालना देण्यास आणि वय रोखण्यासाठी मदत करते.

 


डाळिंब
- निसर्ग सांगतो डाळिंब रसाचा कलर रक्ता सारखे असते तर ते रक्त वाढीसाठी खाणे चांगले असते असते. न्यूट्रिशन सांगते डाळिंबाचा रस एलडीएल कोलेस्ट्रॉल कणांचे ऑक्सिडेशन रोखून हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करते.रक्तदाब कमी करण्यास आणि तग धरण्याची क्षमता आणि व्यायामाची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करते.

बीट - निसर्ग सांगतो बीट हे देखील लाल असते जे आपल्या खाणे  रक्तवाढीसाठी चांगले असते. न्यूट्रिशन सांगते बीटरूट मध्ये लोह, खनिज आणि जीवनसत्त्वे आहेत. ॲनिमिया झालेल्या लोकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. बीटरुटचा रस लोह आणि व्हिटॅमिन सीचा उत्कृष्ट स्रोत आहे, जो अशक्तपणासाठी चांगला मानला जातो.


 
सफरचंद - निसर्ग सांगतो सफरचंद हे हृदया सारखे दिसते ते हृदयासाठी खाणे चांगले असते. आणि न्यूट्रिशन सांगते सफरचंद  मध्ये उच्च फायबर आहेत,कोलेस्टेरॉलला कमी करायला मदत करते. आणि पॉलीफेनॉल्स आहेत, रक्तदाब कमी करायला उपयोगी आहे.

 पपई -पपई हे पोटाच्या आकारासारखे असते म्हणून ती खाणे पोटासाठी चांगली असते.पपई खाल्ल्याने पचनास प्रोत्साहन मिळते, अपचन कमी होते आणि यामध्ये निरोगी ॲसिड असते जे पोट शांत ठेवते.


केळी
-केळ्यांचा घड हा आतड्या सारखा दिसतो तो आपल्या आतड्यांसाठी खाल्लेला चांगला असतो.केळी पचनास मदत करणारा एक उत्तम आहार आहे. उलट्या आणि अतिसार सारख्या पोटाच्या आजाराने ग्रस्त असल्यास केळे खाल्ल्यामुळे आराम पडतो.

अशा प्रकारचे एक ना हजारो उदाहरणे पाहू शकतो जर आपण निसर्गात निरखून पाहिले असता त्या अनेक गोष्टी समजून येतात. निसर्गासारखा महान गुरु कोणी नसेल.

हा ब्लॉग पूर्ण वाचल्याबद्दल मी आभारी आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता.ब्लॉग आवडल्यास लाईक, कमेंट्स, शेअर नक्की करा. आणि अशाच हेल्दी टिप्स वाचण्यासाठी  आणि पाहण्यासाठी माझा फेसबूक ग्रुप Madhura's Fitness Motivation जॉईन करा.

पुन्हा भेटू धन्यवाद.....

Comments

  1. खूप छान लिहिलंय 👍🏻 अगदी दैनंदिन जीवनात उपयोगी अशी माहिती

    ReplyDelete
  2. मस्त माहिती

    ReplyDelete
  3. Mast examples.kadhi vicharach nahi kela .nvn mahiti kalali.Thank you.

    ReplyDelete
  4. खूपच छान मार्गदर्शन केलंस मधुरा
    Thank you so much

    ReplyDelete
  5. खूप सुंदर समजावलं आहेस मधुरा. छान images

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

2021... नवीन वर्षात शरीराचे आरोग्य हीच खरी संपत्ती.

Covid-19-Powerfull 5 steps to boost your immunity in 21 days