लहान मुलांच्या खाण्याच्या हेल्दी सवयी लावण्यासाठी 4 महत्त्वाच्या टिप्स


आजच्या बदलत्या जीवनशैलीनुसार लहान मुलांना चॉकलेट, बेकरी प्रॉडक्ट, कॅडबरी, आइस्क्रीम अशा गोड पदार्थ खाण्याच्या सवयी खूप लागतात. आणि मुले एवढी त्या पदार्थांच्या आहारी जातात की एखाद्या वेळेस जर त्यांना ते पदार्थ मिळाले नाही तर रडून उपाशी राहतात. यासाठीच आधी त्यांना त्या पदार्थांची सवय लावून न देणे हा एकच पर्याय असतो. एखाद्या वेळेस आपण हे पदार्थ दिले तरी चालेल, पण सारखे सारखे देणे म्हणजे, आपण त्यांच्या सवयींना खतपाणी घालत असतो,आणि नकळतपणे त्यांच्या आरोग्याची हेळसांड करत असतो. याची या मुलांच्या आई-वडिलांना जाणीवच होत नाही, आणि जेव्हा जाणीव होते तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते.


मी मधुरा आंबेकर न्यूट्रिशनिस्ट आणि नॅचरलफिटनेसएक्सपर्ट Madhura's Fitness Motivation चैनल ची निर्माती.मला  डिसेंबर 2022 पर्यंत 10000 लोकांच्या फिटनेसमध्ये सकारात्मक बदल घडवून आणायचे आहेत. बदलत्या जीवनशैलीनुसार लहान मुलांच्या खाण्याच्या हेल्दी सवयी कशाप्रकारे लावू शकतो, हे मी  सांगणार आहे, त्यासाठी हा ब्लॉग पूर्ण वाचा.

 तर मग चला जाणून घेऊया....


परिपूर्ण संतुलित आहार देणे 


लहान मुलांमध्ये पोषणतत्वांची कमतरता त्यांच्या संपूर्ण आरोग्यावर आयुष्यभर परिणाम करत असते.बालपणामध्ये आपण एक चांगले आई-वडील म्हणून त्यांना चांगल्या खाण्याच्या सवयी लावून भविष्यात त्यांना मोठ्या आजारापासून आपण वाचवू शकतो. लहान मुले जे टीव्हीवर फास्ट फुड्सच्या जाहिराती बघून जे दिसेल ते मागतात. कारण त्यांना त्याबद्दल कुतूहल असते. ते एखाद्या वेळेस आपण त्यांना आणूनही दिले तरी चालेल, पण ते जर त्यांना सतत सारखे तुम्ही आणून देत असाल तर ती सर्वस्वी तुमची चूक आहे. कारण मुलांना फास्ट फूडस् खाऊन भविष्यात त्याचे दुष्परिणाम काय होतील याची समजही नसते. त्यामुळे आपण त्यांना एक चांगले पालक म्हणून त्यांना समज द्यायची. नीट समजून सांगायचे की ते सारखे खाल्ले तर त्याचे वाईट परिणाम होणार आहेत. प्रेमाने समजवायचे.मुले नक्की ऐकतात.लहान मुलांना जेवणामध्ये परिपूर्ण संतुलित आहार असणे, त्यांना संतुलित जेवणाची सवय लावणे हे सर्वस्वी आपल्या हातात आहे.

मुले मोठ्यांचे अनुकरण करतात


 मुलं हट्टी असेल तर ऐकत नाही तेव्हा त्यांना शांत ठेवणे जेव्हा भूक लागेल तेव्हा तुमचे मूल जे तुम्ही द्याल ते आवडीने खाते. एकदा त्यांना सवय लागली की ते सर्व आवडीने स्वतःहून खातात. पण आपणच त्यांचे नको ते लाड पुरवले तर मग त्रास आपल्याला आणि भविष्यात त्यांनाही होईल. लहान मुले मोठ्यांचे अनुकरण करतात त्यामुळे लहान मुलांसमोर आपणही जेवताना काही खाताना हेल्दी आणि पौष्टिक असेल तेच खावे, म्हणजे मुलेही आपले अनुकरण करतात.पण जर आपणच बाहेरच्या हॉटेलच्या जेवणाची सवय असेल, फास्ट फूड जेवण आवडत असेल तर मुलांनाही त्याच वाईट खाण्याच्या सवयी लागतात.


घरामध्ये असणारा खाऊचा डबा

 लहान मुलांचे वाढते वय असल्यामुळे त्यांना भूक ही सारखी लागत असते. अशा वेळी हेल्दी पदार्थ घरामध्ये चणे, शेंगदाणे,गूळ, काजू, बदाम, मनुका, खजूर ,ड्रायफ्रुट्स अशा हेल्दी स्नॅक्स ने आपल्या घरामध्ये असणारा खाऊचा डबा भरून ठेवला, म्हणजे लहान मुले भूक लागल्यावर ते स्वतः घेऊन खातात.आणि खाण्याच्या वाईट सवयी आपोआप निघून जातात. जर आपणच बेकरी प्रोडक्ट, कॅडबरी, केक, पॅकेज फूड्स, मॅगी, पास्ता,जाम, बिस्किट्स, चिवडा, फरसाण अशा वस्तू भरून तर घरामध्ये ठेवल्या तर त्याच खाण्याच्या सवयी लागतात.


कोल्ड् ड्रिंक साठी पर्यायी हेल्दी ड्रिंक



 लहान मुलांना अजून एक  सवय असते. कोल्ड्रिंक्स पिण्याची साखर मिश्रीत गोड पेय जसे फ्रूटी, मॅगो, ज्यूस, कोको कोला या सवयी आपणच त्यांना लावून देत असतो. या कोल्ड्रिंक्स मध्ये फक्त प्रिझर्वेटिव्ह आणि भरपूर साखर असते. कोल्ड्रिंक्स वर फळांचे नाव फक्त नावाला असतात, त्यामध्ये फळांचा अंश नसतो, आणि ते शरीराला खूपच हानिकारक असतात.या हानिकारक सवयी त्यांच्या आपण कमी करू शकतो. घरांमध्ये आपण त्यांना लिंबू पाणी त्यामध्ये साखर मिसळून देऊ शकतो. किंवा कोकम सरबत,आवळा सरबत देऊ शकतो. काही मुलं तहान लागली तरच पाणी पितात त्यामुळे त्यांना डिहायड्रेशन होते, तर आपण वेळोवेळी त्यांना पाणी पिण्याची सवय लावायला हवी. मुलांना चांगल्या सवयी आपण अगदी लहानपणापासून लावू शकतो आणि त्यांना त्यांचे चांगले आरोग्य भविष्यात देऊ शकतो.

हा ब्लॉग पूर्ण वाचल्याबद्दल मी आपली आभारी आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स मध्ये नक्की विचारू शकता ब्लॉग आवडल्यास कमेंट्स ,शेअर ,लाईक ,नक्की करा, आणि अशाच हेल्दी टिप्स वाचण्यासाठी ,पाहण्यासाठी माझा फेसबुक ग्रुप Madhura's Fitness Motivation नक्की जॉईन करा.

Comments

  1. खूपच सुंदर ब्लॉग मधुरा.
    या ब्लॉग चा सगळ्या आयांना नक्कीच फायदा होईल

    ReplyDelete
  2. खूप छान मधुरा

    खूप सुंदर टिप्स

    ReplyDelete
  3. खूप छान माहिती

    ReplyDelete
  4. खूप खूप टीप्स

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

2021... नवीन वर्षात शरीराचे आरोग्य हीच खरी संपत्ती.

Covid-19-Powerfull 5 steps to boost your immunity in 21 days

निसर्गाची किमया आणि........