आजच व्यायामाला सुरुवात करण्यासाठीचा 4 महत्त्वाच्या टिप्स

 


तुमच्या बाबतीतही असे घडते का नवीन वर्षाला छान व्यायामाला सुरुवात करून खूप छान फिटनेस करू... पण हे किती महिने किंवा किती दिवस प्रोग्रॅम चालतो,हे आजवर तुम्हाला समजलेच असेल. मी नवीन वर्षाला व्यायाम चालू करेन.... या सापळ्यात फसू नका, जे काय करायचे ते आजपासूनच करणार, कारण असे नाही केले तर तुम्ही स्वतःलाच फसवत. आहात. नवीन वर्षाला सुरुवात केली तर ती नियमितपणे कशी करू शकतो याचा विचार नक्कीच करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिटनेस जर चांगला पाहिजे असेल तर एक्सरसाइज हा रेग्युलर करायलाच पाहिजे. तुम्ही काही कालावधीसाठी एक्सरसाइज करून तो सोडून देता जसे  फक्त वेटलॉस साठी  एक्सरसाइज करणे जे चुकीचे आहे. कारण फिटनेस निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.

FITNESS is not Temporary process, FITNESS is Permanent process.

मी मधुरा आंबेकर... न्यूट्रिशनिस्ट, नॅचरल फिटनेस एक्सपर्ट, मला  डिसेंबर 2025 पर्यंत 10000 लोकांच्या फिटनेसमध्ये सकारात्मक बदल घडवून आणायचे आहेत. मी तुम्हाला आजच व्यायामाला सुरुवात करण्यासाठीच्या महत्त्वाच्या 4 टिप्स सांगणार आहे. यासाठी माझा ब्लॉग पूर्ण वाचा.

कारण 1000 मैलाचा प्रवास चालू करण्यासाठी पहिले पाऊल आज पडणे महत्त्वाचे असते.विचार करण्यात एकही सेकंद घालू नका खूप आधीच  व्यायामाला सुरुवात करायला हवी होती. चांगल्या फिटनेससाठी आपल्याला चौरस आहार तर घ्यायचं आहे,पण त्याचबरोबर चौरस व्यायामाचे ही आपल्याला गरज असते.

तर मग जाणून घेऊया 4  महत्त्वाच्या टिप्स 

1. वय वाढण्याची प्रक्रिया कमी होते-


जसे वय वाढत जाते तसेच स्नायू हाडांची घनता कमी होत असते,पण नियमित व्यायामाने हे टाळू शकतो.जर तुम्ही नियमितपणे व्यायाम केला तर अकाली येणारे वृद्धत्व  किंवा आपण आपले वय लपवु शकतो,याचे कारण म्हणजे प्रत्येक वेळी व्यायाम करताना शरीरातील पेशींची सूक्ष्म प्रमाणात मोडतोड होते शरीर ती मोडतोड जुळुन घेते. शरीराला व्यायाम नियमित दिला तर शरीर दुरुस्ती करत असते व नवीन पेशींची निर्मिती करत असते,ज्याने करून तुम्ही पुढच्या वेळेस त्याच प्रमाणात व्यायाम केला तरी पेशींची मोडतोड होत नाही त्यामुळे स्नायूंची वाढ होते, आणि वय होण्याची प्रक्रिया उलटवली जाते.

याउलट वय वाढताना हाडं आणि स्नायू कमजोर होऊन चरबी कमी होऊ लागते, तुम्ही अगदी किडकिडीत व शरीराची ताकद भराभरा उतरू लागते, हे अगदी एकाएकी एकदम होत नाही सावकाश होत असते, आपण वय वर्षे 30 ला आलो की या क्रिया चालू होतात. आपण वेळीच व्यायाम केला तर हे सर्व टाळू शकतो. याशिवाय व्यायामामुळे अँटिऑक्सिडंट आणि रक्त प्रवाहास प्रोत्साहन मिळते, जे आपल्या त्वचेचे संरक्षण करते व वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात.

2.शरीरातील जास्त चरबीचे प्रमाण कमी होते-


शरीराला ज्याप्रमाणे चौरस आहाराची गरज असते, त्याचबरोबर चौरस व्यायामाची ही गरज असते. शरीराचा  योग्य प्रकारे जर आपण नियमितपणे व्यायाम केला तर, शरीरामध्ये स्नायूंची वाढ होते, शरीराची दुरुस्ती आणि स्नायूंची पुनर्बांधणीसाठी कॅलरीज खर्च होतात. त्यामुळे आपल्या शरीरातील चरबी आपोआप कमी होते. हे सर्व योग्य प्रकारे व्यायाम  जसे वेट लिफ्टिंग किंवा बॉडी वेट व्यायाम केल्यावर 24 तास ते 48 तास क्रिया होत असतात.त्याच बरोबर व्यायाम करत असताना वेगळ्या कॅलरीज जळतात ही गोष्ट  वेगळी. स्नायू वाढले की BMR  वाढतो म्हणजे चयापचयाचा वेग वाढतो. व्यायामाचा अभाव असेल तर स्नायू तयार होण्याचा वेग हा कमी असतो आणि स्नायू पेक्षा फॅटचे प्रमाण जास्त असते,परिणामी वजन वाढतच जाते.

3. अनेक मोठ्या आजारांना दूर ठेवते-


नियमित व्यायाम केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते. आपल्या कोलेस्ट्रॉलचे संतुलन होते, कोलेस्ट्रॉल दोन प्रकारचे असतात LDLआणि HDL. LDL ला बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतात. HDL ला गुड कोलेस्ट्रॉल म्हणतात. व्यायामामुळे गुड कोलेस्ट्रॉल HDL वाढविण्यास होते. याशिवाय हाडांचे आरोग्य सुधारते, शरीरामध्ये ऊर्जा आणि ताकत निर्माण होते, यामुळे  सतत थकवा  येतो तो कमी होतो.मधुमेह कमी करतो, इन्सुलिन लेवल  संतुलन ठेवतो. चिंता, नैराश्य भावना कमी करतो. मानसिक आरोग्य चांगले राहते. ज्या लोकांना निद्रानाश त्रास असेल तर त्यांना झोपही छान लागते.

4. शारीरिक तग धरण्याची(stamina) क्षमता विकसित करणे-


शारीरिक व्यायामामुळे तुमची ऊर्जा आणि दीर्घ कालावधीत तक धरण्याची क्षमता म्हणजेच स्टॅमिना वाढतो. चांगल्या आरोग्यासाठी हृदयाशी संबंधित व्यायाम जसे धावणे ,सायकलिंग , डान्स, त्यामुळे आपले हृदय आणि फुफ्फुस यांची कार्यक्षमता वाढते.थकवा कमी होतो. वेटलिफ्टिंग आणि बॉडी वेट व्यायाम जसे पुशअप, क्रंचेस इत्यादींसारख्या व्यायाम नियमित केल्याने स्टॅमिना (स्नायूंमधील तग धरण्याची क्षमता) वाढतो. दीर्घकाळ असे व्यायाम केल्याने शरीरामध्ये आश्चर्यकारक बदल होतात, जे शरीराला अधिक सुंदर बनवतात.

हा ब्लॉग वाचल्याबद्दल अत्यंत आभारी आहे. ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारू शकता. अशाच महत्त्वाच्या हेल्थ टिप्स साठी माझा फेसबुक ग्रुप मधुराज फिटनेस मोटिवेशन नक्की जॉईन करा.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

2021... नवीन वर्षात शरीराचे आरोग्य हीच खरी संपत्ती.

Covid-19-Powerfull 5 steps to boost your immunity in 21 days

निसर्गाची किमया आणि........