दिवाळी डायट मधील महत्वाचे 7 बदल ज्यामुळे वजन वाढणार नाही

 


या दिवाळीमध्ये लाडू स्वीट खायचे आहेत,आणि जास्त वजन ही  वाढवायचे नाही, असे झाले तर किती छान.काही व्यक्ती  डायट बद्दल खूपच काळजी करून दिवाळीचा आनंद घेत नाहीत. आणि काही तर त्यांचे उलट असतात.जास्तच जास्त स्वीट आणि फराळ खाऊन वजन आणि कोलेस्ट्रॉल वाढून घेतात. पण जर आपण दिवाळीमध्ये स्वीट ,फराळ खाताना थोडी काळजी घेतली तर आपले वजनही वाढणार नाही, आणि दिवाळी छान पैकी एन्जॉय करू....

नमस्कार, मी मधुरा आंबेकर न्यूट्रिशनिस्ट आणि नॅचरल फिटनेस एक्सपर्ट, मधुराज फिटनेस मोटिवेशन ची निर्माती. मला येत्‍या डिसेंबर 2021 पर्यंत 10000 लोकांच्या फिटनेस मध्ये सकारात्मक बदल घडवून आणायचा आहे. मी तुम्हाला दिवाळी मधील 7 आहारातील बदल सांगणार आहे ज्यामुळे आपले वजन वाढणार नाही आणि दिवाळी छान पैकी एन्जॉय करू. त्यासाठी माझा ब्लॉग पूर्ण वाचा.

तर मग मग चला जाणून घेऊया ते 7 आहारातील बदल

1) दिवाळी फराळ किंवा स्वीट बाहेरून घेऊन खाऊ नका -


दिवाळीमध्ये सर्वात पहिले म्हणजे आपण जे काही फराळ  स्वीट्स खाणार आहोत ते शक्यतो घरात बनवलेले पाहिजे ,कारण बाहेरचे पदार्थ बनवताना कोणते तेल वापरले असेल, कोणते प्रिझर्वेटिव्ह  टाकत असतील, जेणेकरून पदार्थ फ्रेश राहतात, याबद्दल काहीच माहिती नसते. किंवा कशा पद्धतीने बनवले असेल हे हेदेखील आपल्याला काहीच माहिती नसते आणि महत्त्वाचे म्हणजे आपण स्वतः बनवलेले पदार्थ खाणे यामध्ये एक वेगळाच आनंद असतो जो बाहेरचे पदार्थ खाऊन मिळत नाही. आणि खरच जर इमर्जन्सी असेल तर ओळखीचा माणसांकडून ते पदार्थ बनवून घ्यावेत जेणेकरून ते हेल्दी राहतील.

2)  स्वीट किंवा फराळ खाण्यापूर्वी फायबर युक्त पदार्थ खावेत.-




दिवाळीमध्ये खूप सार्‍या मिठाई आणि फराळ यांचे डिशेस सारखे आपल्या हातात येतात. जे डायट वर आहेत त्यांना  प्रश्न पडतो खाऊ की नको किंवा काही बिनधास्त खातात. पण मिठाई खाण्याआधी जर तुम्ही फायबर चे पदार्थ खाल्ले तर, तुम्हाला मिठाईचे पदार्थ पचायला खूप मदत होते किंवा त्यामुळे तुमचे वजन नॉर्मल राहू शकते.

3) रात्री मिठाई  फराळ  खाऊ नका-


दिवाळीचे पदार्थ हे कार्बोहायड्रेड आणि फॅट युक्त असतात. ते पचायला जड असतात. शक्यतो दिवसा खा जेणेकरून आपली पचनशक्ती तेव्हा चांगली असते. सूर्योदयानंतर खाण्याचे टाळा त्यामुळे शरीरामध्ये फॅटचे प्रमाण वाढणार नाही.

4) वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर टाळा.


दिवाळीमध्ये फराळ करताना खूप सारे तेल हे उरलेले असते, काही महिला ते तेल दररोजच्या जेवणात फोडणीमध्ये  वापरतात. पण तसे करणे शरीरासाठी हानिकारक असते. हे तेल वापरून ट्रान्स फॅटी तेल बनते जे शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढविते, आणि हार्ट चे प्रॉब्लेम होऊ शकतात.

5) पाण्याचे प्रमाण वाढवा-


या दिवसांमध्ये पाण्याचे प्रमाण वाढविले पाहिजे शरीर डिटॉक्स  राहायला मदत होते शरीरामधून टॉक्सिन बाहेर पडण्यास पाण्यासारखे डिटॉक्स नाही. याशिवाय शरीरामध्ये पाणी असेल तर हायड्रेट राहते, आणि तुमचे वजनही जास्त वाढणार नाही.

6) नियमित एक्सरसाइज करा-


नियमित एक्सरसाइज केल्याने तुमचे मेटाबोलिजम वाढते, जरी तुम्ही दिवाळीचे फराळ जास्त खाल्लात, तरी ते चांगले पचवू शकता. याशिवाय एक्सरसाइज केल्याने आपण खाल्लेले कॅलरीज  बर्न करू शकतो.

7) डायबिटीज साठी टीप-


ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी व्हाईट शुगर आणि मैद्याचे पदार्थ खाऊ नये, तुम्ही ब्राउन राईस पोह्यांचा चिवडा खाऊ शकता चकली मध्ये तुम्ही सर्व मिक्स डाळींची चकली बनवून खाऊ शकता. जे पदार्थ गोड आहेत त्यांना नमकीन बनवून खाऊ शकता, उदाहरणार्थ शंकरपाळ्या. स्वीट खाण्यासाठी तुम्ही  ड्रायफ्रूट आणि खजुर यांनी केलेल्या लाडू किंवा चिक्की खाऊ शकता असे हेल्दी ऑप्शन खाऊन मनसोक्त दिवाळी साजरी करा.

एवढे सर्व वाचूनही तुम्ही तुमच्या  पद्धतीने खाणार असाल आणि जर तुमचे वजन वाढले तर काळजी करू नका मी तुम्हाला वजन कमी करण्याबद्दल वेळोवेळी टीप देणारच आहे. त्यामुळे मनसोक्त खा आणि दिवाळी मध्ये खूप एन्जॉय करा. माझा ब्लॉग पूर्ण  वाचल्याबद्दल धन्यवाद. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स मध्ये नक्की विचारा.आणि अशाच हेल्दी टिप्स साठी माझा फेसबुक ग्रुप जॉईन करा.

सर्वांना💥💥 शुभ दिपावली  💥💥

Comments

  1. मधुरा खूप उपयुक्त लेख लिहिला आहेस

    ReplyDelete
  2. लेख खूपच आश्वासक आहे....आस्वाद घेणाऱ्यांसाठी.
    धास्ती न बाळगता आता आनंदाने दिवाळीचा फराळ करायला हरकत नाही. 🎉👍
    मनसोक्त खा आणि नियमाने व्यायाम करा....

    ReplyDelete
    Replies
    1. Khup chan information aahe....tentionch kami zal thanks 👍👍

      Delete
    2. खूपच छान मॅडम
      खूप छान मार्गदर्शन केलंत
      Thank u

      Delete
  3. Khup chan tips aahet.saglyani follow karayla pahije 👍👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

2021... नवीन वर्षात शरीराचे आरोग्य हीच खरी संपत्ती.

Covid-19-Powerfull 5 steps to boost your immunity in 21 days

निसर्गाची किमया आणि........