चांगल्या फिटनेससाठी प्रत्येकाकडे Customised Dietplan असण्याची 7 महत्वाची कारणे
आत्तापर्यंत डायट प्लान हे फक्त वेटलॉस किंवा वेटगेन साठीच असते, असे वाटायचे पण आता फक्त तुम्ही तुमचा customised dietplan घेऊन कितीतरी आजारांना दूर ठेवू शकता. जसे थायरॉईड, अपचन , गॅसेस , ऍसिडिटी, हेअर फॉल, स्किन प्रॉब्लेम, डायबिटीस, हायकोलेस्ट्रॉल, पीसीओडी हार्मोनल इंबॅलेन्स, अर्थराइटिस,अशा अनेक आजारांपासून सुटका मिळू शकते, यासाठी फक्त तुम्ही एक healthy lifestyle आणि एक चांगला customised dietplan फॉलो करायची गरज आहे. तर हे सर्व पॉसिबल आहे. जर तुम्हाला आधीपासून कोणतेही डायट प्लॅन फॉलो होत नसेल तर प्रॉब्लेम तुमचा नाही तर तुमचा डायट प्लान चा आहे. डायट प्लान तोच चांगला जो सहज follow होऊ शकतो. जर त्यामध्ये आपल्या किचन मधल्या आणि आपल्याच प्रदेशातल्या पदार्थ असणे गरजेचे असते. कोणतेही फॅन्सी आणि आणि विदेशी पदार्थ हे आपण जास्त दिवस आपल्या dietplan मध्ये फॉलो करू शकत नाही.
नमस्कार मी मधुरा आंबेकर न्यूट्रिशनिस्ट आणि नॅचरल फिटनेस एक्सपर्ट Madhura's Fitness Motivation चैनल ची निर्माती.मला येत्या पाच वर्षात पर्यंत 10000 लोकांच्या फिटनेसमध्ये सकारात्मक बदल घडवून आणायचे आहेत.मी तुम्हाला अशी सात कारणे सांगणार आहे,ज्यामुळे तुम्हाला असे वाटेल की आपल्याकडेही स्वतःचा customised dietplan असायलाच हवा. त्यासाठी हा ब्लॉग पूर्ण वाचा.
तर मग चला जाणून घेऊया ती कारणे...
1)healthy weightloss/weightgain-
जर तुम्हाला हेल्दी पद्धतीने वेटलॉस किंवा वेटगेन करायचे असेल तर त्यासाठी एक योग्य प्रोटीन, विटामिन ,जीवनसत्वे ,फायबर युक्त डायट प्लॅन असणे खूप गरजेचे असते कारण चांगल्या फिटनेससाठी 80% रोल हा आपल्या बॅलन्स डाएट आहाराचा असतो. आणि 20% रोल हा एक्सरसाइज असतो. फक्त एक्सरसाइज करून जर तुम्ही आहार योग्य घेतला नाही तर रिजल्ट झीरो मिळतो. खूप साऱ्या युट्युब वर व्हिडिओ असतात 7डेज मध्ये 10 किलोग्राम वेटलॉस... पण लक्षात घ्या जेवढ्या तुम्ही वेटलॉस फास्ट कराल तेवढ्याच दुपटीने तो जेव्हा तुम्ही सोडता तेव्हा रिटर्न वाढते. अशा फास्ट वेटलॉस मध्ये side effect खूप होतात, जसे हेअरफॉल ,अशक्तपणा. त्यामुळे तुम्ही तीन महिन्याचा customised dietplan घेऊन डायटप्लॅन फॉलो करावा. सर्वात जास्त प्रश्न असतो किती दिवसात किती किलो वेटलॉस होईल.. पण लक्षात ठेवा, वेटलॉस तर होणारच आहे. पण तो हेल्दी कसा होईल याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. साधारण महिन्याला दोन ते तीन किलो ग्रॅम वेटलॉस होत असतो.
2)Inch loss-
वेट वाढताना आपले प्रथम पोटावरचे फॅट वाढते. नंतर मांड्यांवर चे फॅट वाढते,नंतर हातावरचे, नंतर मानेवरचे असे टप्प्याटप्प्याने वजन वाढते, जेव्हा वेटलॉस करताना हे उलटे होत असते. आधी सर्वात पहिले मानेचा भाग डबल चीन गायब होतं, नंतर हात नंतर लास्ट ला पोट राहते. आणि त्यासाठी सर्वात जास्त मेहनत घ्यावी लागते. म्हणजेच हेल्दी वेट लॉस मध्ये फक्त वजन कमी होते होत नाही, तर आपले inchloss होणे गरजेचे असते. यासाठी महत्त्वाचे आहे आपण पण नियमितपणे एक तास तरी एक्सरसाइज करण्याची गरज असते. वजन कमी करताना त्वचा लूज होते तिला टाईट करण्यासाठी एक्सरसाइज ची खूपच मदत होत असते.यासाठी योग्य टाईम लागतो तरच ते हेल्दी असते. जर फास्ट मध्ये करायला गेलात तर रिझल्ट पाहिजे तसा मिळत नाही.तसेच पुरुषांना वेटलॉस मध्ये जास्त inch loss न होता मसल गेन आणि फॅटलॉस होणे गरजेचे असते.
3)say good by to pills-
एक चांगला customised dietplan खूप सार्या आजारांना दूर ठेवत असतो.आजकाल लोकांना फास्ट रिझल्ट हवा असतो, तो सर्वच बाबतीत पण त्याचे साईड इफेक्ट कडे लक्ष देत नाहीत. खूप सार्या गोळ्या आपण लवकर बरे होण्यासाठी खात असतो. पण त्या गोळ्या खूप वर्षे घेतल्याने एखादा अवयव कायमचा निकामी होऊ शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त हेल्दी जीवनशैली आणि आयुर्वेदिक पद्धतीने आजारांकडे बघा. एक चांगली जीवनशैली आपण लावून घेतली तर आजार आपल्या आजूबाजूला फिरकणार ही नाही. पण सर्व जण फास्ट रिझल्ट च्या पाठी लागून आपल्या शरीराचे नुकसान करत असतो. खूप सारे आजार आहेत,जसे अपचन ,गॅसेस , ऍसिडिटी ,थायरॉईड हायकोलेस्ट्रॉल, पीसीओडी, हायबीपी ,डायबिटीस, अर्थराइटिस, प्रॉब्लेम अशा अनेक आजारांना आपण पण वर्षानुवर्षे गोळ्या खात असतो.डॉक्टर एकदा बोलले की तुम्हाला ही गोळी कायमची घ्यायची आहे. तर तुम्ही फक्त गोळी घेऊनच तो आजार बरा करायचा विचार करता, पण थोडा आपल्या चुकीच्या जीवनशैली कडे जर बघितले, तर सर्व आजारांचे मूळ यामध्येच आहे असे दिसून येईल.
4)Active & energetic life-
आपल्या शरीरात कोणत्या न्यूट्रिशन ची गरज असते हे डायट प्लॅन करताना पाहणे खूप गरजेचे असते. तुम्हाला जेवणात काय आवडते कोणत्या गोष्टी ऍलर्जिक आहेत या गोष्टी पाहूनच डायट प्लान बनवला जातो. एकच डायट प्लॅन सर्वांना लागू पडत नाही. एकच डायटप्लॅन फोलो केल्याने सर्वांना रिझल्ट पाहिजे तसा मिळत नाही. आपल्या शरीराच्या गरजेनुसार डायटप्लॅन असणे खूप महत्त्वाचे आहे. एक चांगला डायटप्लान आपल्याला दिवसभर ऍक्टिव्ह एनर्जेटिक ठेवत असतो कारण त्यामध्ये कोणताही शॉर्टफॉर्म नसतो ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या आपल्याला करायलाच लागतात जसे एक्सरसाइज आणि योग्य बॅलन्स डायटप्लॅन. जर तुम्हाला काही डायटप्लान मुळे दिवसभर थकवा वाटत असेल तर तो डायटप्लॅन आपण जास्त दिवस फोलो करू शकणार नाही व पुन्हा पूर्वीसारखेच खायला लागू. किंवा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वेटलॉस करत असाल ,तर तुम्हाला दिवसभर थकल्यासारखे वाटू शकते.
5)better sleep-
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना एवढे टेन्शन वाढले की पूर्ण रात्रभर काहीजण झोपत नाहीत.आणि काहीजण मोबाईलवर आपला वेळ रात्रभर जागरण करून घालवतात,आणि झोपेचा त्रास स्वतःहून करून घेतात.पण एक चांगली झोप आपल्या शरीरात डॉक्टरां सारखे काम करत असते. जर शरीरामध्ये डॉक्टर असेल तर तुम्हाला बाहेरच्या डॉक्टरांकडे जायचे वेळच येत नाही. योग्य टाइम मध्ये झोपल्यावर दिवसभर शरीराची झीज होत असते, ती भरून निघत असते. त्यामुळे योग्य टाईम मध्ये झोपणे आणि योग्य टाइम'मध्ये उठणे खूप गरजेचे आहे. आणि एक तणावरहित आणि चांगली जीवनशैली जगायची असेल तर शरीराला आराम देणे खूप गरजेचे असते. आमच्या customised dietplan मध्ये वेळेवर झोपणे आणि उठणे आम्ही सर्वात आधी सांगतो जे आजकालच्या धकाधकीच्या जीवनात खूपच आवश्यक आहे.
6)Glowing skin-
खूप सारे लोक गोरे होण्यासाठी त्वचेवर चेहऱ्यावर खुपसार्या क्रीम लोशन वापरतात. पण लक्षात घ्या भारतीय लोक हे गव्हाळ रंगाचे आहेत. गोरे नाहीत. ब्रिटिश लोक गोरे होते. त्यामुळे आहे तोच रंग आपण जास्त इफेक्ट ग्लो कसा येईल, याकडे लक्ष दिले पाहिजे त्यासाठी आपले शरीर पाण्याने हायड्रेट राहील. याकडे लक्ष दिले पाहिजे. शरीरामध्ये पाहिजे ती जीवनसत्वे, प्रोटीन, मिनरल गेले पाहिजेत. योग्य बॅलेन्स डाएट मुळे शरीरात नको असलेल्या टॉक्सिन तयार होत नाहीत ,जसे पिंपल्स.हे सर्व बॅलेन्स झाले की आपल्या त्वचेला ग्लो येतोच.
7)positive mindset-
आपण जर कोणतीही गोष्ट पॉझिटिव्ह माईंड ने केली तर ती गोष्ट शंभर टक्के होणारच असते. पण त्यासाठी आपला प्रत्येक गोष्टींकडे बघायचा माईंड पॉझिटिव हवा. यासाठी माईंड वर थोडे काम करण्याची गरज असते ही खूप शुल्लक गोष्ट लोकांना वाटते. पण त्यामध्ये खरंच वास्तविकता आहे. जी गोष्ट खूप मेहनत घेऊन काही वेळा होत नाही ती गोष्ट फक्त थोडी पॉझिटिव्ह माईंड ने होऊ शकते. एवढी मोठी ताकत आपल्या माईंड मध्ये असते. फक्त आपण वापरत नाही. कारण आपल्याला माईंड हा फ्री मिळालेला असतो. आणि जी गोष्ट फ्री मिळते तिची व्हॅल्यू काही माणसे समजतच नाहीत. वेटलॉस, वेटगेन किंवा आपल्या शरीरात जे बदल हवे आहेत त्यासाठी पॉझिटिव्ह माईंड खूप गरजेचे आहे.माझ्या customised diet plan मध्ये योग प्राणायाम मेडिटेशन यामध्ये पॉझिटिव माईंड खूप छान रिझल्ट येत असतो. फक्त तो करणाऱ्याने मनापासून केला पाहिजे.
हा ब्लॉग पूर्ण वाचल्याबद्दल मी आभारी आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता.ब्लॉग आवडल्यास लाईक, कमेंट्स, शेअर नक्की करा. आणि अशाच हेल्दी टिप्स वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी माझा फेसबूक ग्रुप Madhura's Fitness Motivation जॉईन करा.
पुन्हा भेटू धन्यवाद.....








Khup chhan .
ReplyDeleteNice information
Thank you shraddha
Deleteखूप छान. माहिती आहे mam
ReplyDeleteThank u sonal mam
DeleteNice information 👍🏻👍🏻
ReplyDeleteThank u pallavi
DeleteGood Informaion, Background Blue nako I feel, Blue and black combination get problem to read
ReplyDeleteThank you suyash... change theme
DeleteVery informative
ReplyDeleteThank you sir
DeleteVery informative
ReplyDeleteThank you madam
ReplyDeleteखूप सुंदर ब्लॉग लिहिला आहे पुढील ब्लॉग वाचण्याची उत्सुकता आहे.
ReplyDeleteThank u sunita tai
Deleteखूप छान माहिती
ReplyDeleteChan
ReplyDeleteखूपच छान माहिती दिलीत मॅडम
ReplyDeleteThank you uchita madam
ReplyDeleteKhup Chaan Blog aahe Madhura Ma'am....
ReplyDeleteखुप छान माहिती दिली मॅडम
ReplyDelete