चहा पिणे खरच गरजेचे आहे का?
आणि प्रत्येक प्रदेशात चहाची निवड ही वेगवेगळी असते .चहाचा प्रत्येक प्रकार निसर्गाच्या चांगुलपणाने समृद्ध होतो. त्यामध्ये आरोग्यासाठी खूप कमी फायदे असतात.किंवा तात्पुरता प्रमाणात फायदे असतात. तेही चहा योग्य पद्धतीने बनवल्यावर तुम्हाला चहाचे फायदे मिळू शकतात. परंतु बरेच काही आरोग्यासाठी खूप वाईट असते. कोणतीही गोष्ट अति प्रमाणात झाली की ती आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी नुकसान कारक असते. तुम्हाला जर चहा चे व्यसन असल्यास, ही माहिती वाचून तुम्हाला त्याचे व्यसन निश्चितच कमी करता येईल.

प्रथम आपण चहा पासून शरीरावर कोण कोणते नुकसान होते ते पाहू या
(1) चहा मधून जास्त प्रमाणात कॅफीन असते मेलाटोनिन हा एक संप्रेरक आहे जो आपल्या मेंदुला झोपायची वेळ दर्शवतो कॅफीन मेलाटोनिन चे उत्पादन कमी करतो परिणामी झोपेची गुणवत्ता कमी होते आणि झोपेची समस्या निर्माण होतात

(2) चहा मध्ये कॅफिन असते चहा किंवा इतर कोणत्याही स्त्रोत मधून जास्त कॅफिन घेणे म्हणजे चिंता ,तणाव ,अस्वस्थता या समस्यांना आमंत्रण देण्यासारखे आहे.

(3) चहा मध्ये टॅनिन चा स्त्रोत भरपूर प्रमाणात असतो. तो पाचन क्रियेमधून मिळणारे लोह कमी करू शकतो ,जर तुमच्याकडे लोहाची कमतरता असेल तर चहा पिल्याने ही स्थिती वाढू शकते.

(4)सकाळी चहा रिकाम्यापोटी पिल्याने जास्त नुकसान दायक होते यामध्ये ऍसिडची मात्रा जास्त असते जेव्हा रिकाम्या पोटी चहा पितो तेव्हा ऍसिड पोटातील डायजेस्टिव्ह मिक्स होतो ज्याने ऍसिडिटी , गॅसेस , अपचन प्रॉब्लेम होतात .

(5) दिवसभरातील पाच ते सहा कप चहा शरीराला नुकसानकारक ठरू शकते. जास्त चहा जास्त चहा पिण्याने दातही पिवळे होतात. जास्त चहा पिण्याने बोन्सही कमजोर होतात. आणि युरीन ची ही समस्या होते ज्याने शरीरातील सर्व आवश्यक मिनरल घटक शरीरातून निघून जातात.

(6) गरोदरपणात जर चहा जास्त प्रमाणात घेतला तर गर्भपात किंवा कमी वजनाचे बाळ यांसारखे समस्या निर्माण होतात.

काहीजण याशिवाय राहू शकत नाही.दिवसातून कमीत कमी दोन वेळा तरी त्यांना चहा गरजेचा असत , त्यांच्यासाठी चहा कोणत्या चांगल्या हेल्दी पद्धतीने आपण चहा करू शकतो याच्या काही टिप्स
(1)चहा हा रिकाम्या पोटी कधीही पिऊ नका चहा पिण्याची किंवा सकाळी काहीतरी हेल्दी फूड खा त्यानंतर चहा प्या रिकाम्या पोटी नेहमी हेल्दी फूड खाल्ले पाहिजे. जसे नाश्ता झाल्यानंतर किंवा एखादे फ्रुट्स खाल्ल्यानंतर तुम्ही चहा पिऊ शकता.

(2)चहा मध्ये साखर अजिबात घालू नका .साखरेच्या जागी तुम्ही गुळाचा चा वापर करा किंवा काहीच नाही टाकला तरी चालेल , दूध ही लो फॅट वापरा चहा पिताना छोट्या कप चा वापर करा जेणेकरून चहा शरीरात कमी प्रमाणात जाईल.

(3) चहाचे व्यसन जर खरोखर तुम्हाला कमी करायचे असेल तर तुम्ही चहा ऐवजी ग्रीन टी किंवा हर्बल टी घेऊ शकता. ग्रीन टी मध्ये एंटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असतात. हे आपले मेटाबोलिजम चांगले करते , त्यामुळे वेटलॉस लाही मदत होते.

ज्यांना चहाचे व्यसन आहे किंवा ज्यांना वजन कमी करायचे आहे किंवा काही आजारांमध्ये चहा कसा हेल्दी पद्धतीने आपण पिऊ शकतो त्यासाठी मी दिलेली माहिती तुम्हाला मदत करू शकते. अशाच हेल्दी टिप्स वाचण्यासाठी किंवा पाहण्यासाठी माझ्या फेसबुक ग्रुप ला जॉईन करा. ग्रुपची लिंक खाली शेअर केली आहे. धन्यवाद….
Comments
Post a Comment