"गहू" आपल्या आरोग्यासाठी शाप आहे ? की वरदान आहे?


 तुम्हाला माहिती आहे का? वजन वाढण्याचे प्रमाण हे गेल्या 10-20 वर्षांमध्ये खूपच वाढले आहे. वजन वाढल्यामुळेच वेगवेगळ्या आजारांना सामोरे जाण्याची वेळ येते. पण आपण त्याचे मुख्य कारण शोधत नाही फक्त गोळ्यांचा भडीमार केला जातो. आणि तात्पुरता उपाय शोधला जातो.याचे मुख्य कारण आहे आपली बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहार पद्धती  पण या चुकीच्या पद्धती आपल्याला समजणार कशा कारण त्या खूपच प्रमाणात आहेत. कारण अशा चुका आपण नकळत करत असतो.
  नमस्कार , मी मधुरा आंबेकर nutritionist and natural fitness expert, आणि मधुराज फिटनेस मोटिवेशन ची निर्माती ,येत्या डिसेंबर 2021 पर्यंत मला दहा हजार लोकांच्या फिटनेसमध्ये सकारात्मक बदल घडवून आणायचे आहेत. मी तुम्हाला असे काही पॉइंट सांगणार आहे जे तुम्हाला विचार करायला लावतील ,की गहू  शाप आहे, की वरदान आहे. त्यासाठी हा ब्लॉग पूर्ण वाच. कारण साधारण 30 ते 40 वर्षांपूर्वी  जेवणामध्ये फक्त भाकरी असायची आणि गव्हाच्या पोळ्या या सणांमध्ये  असायच्या, पण आता  नेमके उलटे झाले आहे.आता आपण  कधीतरी  भाकऱ्या खातोय ,काहीजण खातच नाहीत. आणि वर्षाच्या बाराही महिने  गव्हाच्या चपात्या पोळ्या  असतात. जे आपल्या फिटनेससाठी  चांगले नसते.  कारण ,कोणत्याही गोष्टीचे प्रमाणाच्या बाहेर सेवन केले की त्याचा परिणाम हा उलटाच होत असतो.
 तर मग चला पाहूया यातील पहिला पॉईंट...
 1)वेगवेगळ्या रूपाने मोहजाल-

गहू हा संपूर्ण जगात जास्त वापरल्या जाणाऱ्या धान्य पैकी एक धान्य आहे.त्याचे मुख्य कारण म्हणजे गव्हाचे वेगवेगळ्या रूपाने मोहजाल आपल्या दररोजच्या आहारामध्ये आहे.जे आपल्याला नकळत समजतही नाही. जसे मैदा, रवा, ब्रेड,आटा,लापशी रवा हे सर्व गहू पासूनच बनवले जातात.आणि या पासून होणारे पदार्थ  ही खूपच चविष्ट असतात.जसे पास्ता आटा नूडल्स,बर्गर ,बेकरी प्रोडक्ट अशा वेगवेगळ्या पदार्थापासून आपण गहू पोटात ढकलत असतो. आणि त्याचे प्रमाणही भरपूर प्रमाणात असते.
2) फक्त जिभेचे चोचले पुरविणे-

 आपण हे सर्व पदार्थ जे काही खात असतो, ते खरच आपल्या शरीरासाठी गरजेचे आहेत का? याकडे लक्ष कोणी देत नाही, खरेतर या सर्व पदार्थांमध्ये फक्त जिभेचे चोचले पुरवण्याचे काम आणि ऊर्जा देण्याचे काम होत असते.यामध्ये आपल्या प्रत्येकाने आपल्या  शरीराला योग्य जीवनसत्वे  मिळतात का ? हे आपण पाहणे खूप गरजेचे आहे.
3) जीवनसत्वे आणि खनिजे कचऱ्याच्या डब्यात टाकत असतो -

  पूर्ण गहू मध्ये खूप सारे एंटीऑक्सीडेंट,जीवनसत्वे, खनिजे , फायबर हे आपल्या शरीराला मिळतात पण ते आपल्या शरीरा मध्ये खरंच जातात का? कारण गव्हाचे पीठ आपण चाळणीने चाळून त्याचा कोंडा कचऱ्याच्या डब्यात टाकत असतो.आणि त्या कोंडा मध्ये एंटीऑक्सीडेंट, जीवनसत्वे, फायबर हे मिळत असतात. फक्त चिकट युक्त फायबर नसलेला गहू आपण खातो जो पचायला खूपच कठीण असतो. आणि आपल्या आतड्यांमध्ये चिकटून राहतो. ज्याने वेगवेगळे आजार होतात जसे बद्धकोष्टता,अपचन, ऍसिडिटी ,वजन वाढणे आणि वजन वाढल्यानंतर चे आजार.
4) गव्हाचे योग्य प्रमाणात सेवन-

आपल्या आहारामध्ये फक्त चपाती वरूनच गव्हाचे प्रमाण ठरवू नका.कारण  दिवसभरात वेगवेगळे गव्हाचे पदार्थ खातोय तेही ही ॲड करा.योग्य योग्य प्रमाणात  सेवन केले तर गहू  फायदेशीरच आहेत.काही प्रदेशात गहू खातच नाहीत,त्यामुळेच तेथील लोक अधिक सडपातळ आणि निरोगी असतात. कारण  गव्हाचे अतिसेवनामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण हे अत्यंत नाटकीय पद्धतीने वाढत असते. हे सर्व योग्य प्रमाण customised diet plan मध्ये मी देते.

 

5) पारंपारिक पद्धती प्रमाणे भाकरी चे प्रमाण वाढविणे-


  गव्हापेक्षा ही आपल्या पारंपारिक धान्य आहेत.ज्वारी, बाजरी, तांदूळ यामध्येही कार्बोहायड्रेड, फायबर प्रथिने,जीवनसत्वे मिळतात.  आणि हे खाल्ल्यामुळे आपण खूप सार्‍या आजारांपासून दूर  राहतो.आणि हे सर्व धान्य आपल्या देशामध्ये खूपच प्राचीन  आणि पारंपरिक धान्य आहेत, जे आपल्या प्रदेशांमध्ये पिकत असतात. जे निसर्गाने आपल्यासाठी प्रकृतीनुसारच बनवलेले असतात. जे खाणे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असते. आणि जर या धान्यांचे खाण्याचे प्रमाण वाढले, तर आपल्या  शेतातील शेतकऱ्यांना ही खूपच फायदा होईल.

 थोडक्यात सांगायचे म्हणजे, आपण 30-40 वर्षांपूर्वी जेवणामध्ये भाकरी असायची. आणि गव्हाच्या चपात्या पुरणपोळ्या सणांमध्ये करायच्या. ते पुन्हा करण्याची वेळ आली आहे. माझा ब्लॉग पूर्ण वाचल्याबद्दल आभारी आहे ब्लॉग कसा वाटला तर कमेंट मध्ये नक्की सांगा.तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा. आणि अशाच महत्त्वाच्या टिप्स जर तुम्हाला पाहिजे असतील तर माझा madhura's fitness motivation ग्रुप जॉईन करा .

थँक्यू..

Comments

  1. बापरे चपती नको बाबा मग
    आजपासून चपती बंद... लगेच निर्णय..!
    खरच मँडम तुम्ही जे सांगितले ते त्रास मला होतात त्यामुळे मी निर्णय घेतला..।
    धन्यवाद मँडम खूप महत्त्वाचे मार्गदर्शन केले...!

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. Absolutely right, even in a talk of Late. Shrikant Jijkar about Effective Weight Loss, he too has mentioned to bring your Chappati intake to 1 each during 2 meals.

    ReplyDelete
  4. Thank u sir.... right... intake to 1 each during 2 meals

    ReplyDelete
  5. Chapati lunch madhe changli ki dinner madhe? ani kiti khavya?

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

2021... नवीन वर्षात शरीराचे आरोग्य हीच खरी संपत्ती.

Covid-19-Powerfull 5 steps to boost your immunity in 21 days

निसर्गाची किमया आणि........