Covid-19-Powerfull 5 steps to boost your immunity in 21 days





 तुम्ही कधी विचार केलाय का काही लोकं वारंवार आजारी का पडतात? किंवा त्यांना आरोग्य विषयी सारख्या तक्रारी जसे केस गळणे, त्वचारोग, पोट बिघडणे एखादे काम करताना लगेच थकवा येणे, अशा समस्या सारख्या येत असतात याचे मुख्य कारण म्हणजे आपली बदलती जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयी यामुळे आपली रोगांशी लढण्यासाठी इम्युनिटी तेवढी सक्षम नसते.

इम्युनिटी  मजबूत करण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये थोडासा बदल करणे गरजेचे असते.आपण निसर्गातील काही पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या रोजच्या जीवनात अमलात आणल्या पाहिजेत. मी तुम्हाला अशा 5 पावरफूल स्टेप सांगणार आहे, ज्या तुम्ही दररोजच्या जीवनामध्ये अगदी सहज करू शकता.यामुळे तुमची इम्युनिटी तर 100% वाढणारच आहे त्यासाठी तुम्ही स्वतःला 21 day चे चॅलेंज घेऊन ते करून तुम्ही स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवू शकता.

मी मधुरा आंबेकर , फिटनेस ट्रेनर मधुराज फिटनेस मोटिवेशन चैनल ची निर्माती ,येत्या डिसेंबर 2021 पर्यंत मला दहा हजार लोकांच्या फिटनेस मध्ये सकारात्मक बदल घडवून आणायचा आहे. 

चला तर मग जाणून घेऊया त्या 5 स्टेप्स

1) शरीराला सन चार्ज करणे-


सूर्यप्रकाशात राहिल्याने विटामिन  डी मिळते जे आपल्या शरीरामध्ये दात व हाडांना मजबुती देतात आपल्या अन्नातून कॅल्शियम आणि फॉस्फरस हे विटामिन डी शोषून घेते ,त्यामुळे हाडे ठिसूळ होण्यापासून वाचतात. दररोज सूर्योदयानंतर एक तास आणि सूर्यास्ताच्या आधी एक तास हा शरीराला सन चार्ज देण्याची चांगली वेळ असते याशिवाय  सन चार्ज मुळे दिवसभर उत्साहाने काम करण्याची शक्ती मिळते.

2) शरीराला व्यायाम देणे -


व्यायाम करताना अँटी बॉडीज किंवा पांढऱ्या पेशी या सतत बदलत असतात जेव्हा व्यायाम करतो तेव्हा या अँटीबॉडीज शरीरात वेगाने फिरतात पांढऱ्या पेशींमध्ये रोगप्रतिकारक शक्ती असते. त्यामुळे आपली रोगांची लढण्याची शक्ती अधिक वाढते. व्यायाम हा कोणत्याही प्रकारचा करू शकतो. योग मधला प्राणायाम आणि कपालभाति हे खूप प्रभावी आहेत.

3) बैलेंस डाइट प्लान -



आपल्या शरीराला आवश्यक सर्व विटामिन, मिनरल ,प्रोटीन, कार्ब मिळणे गरजेचे असते.त्यामुळे आपण खूप सार्‍या आजारांना दूर ठेवत असतो.काही जण खूप चुकीच्या पद्धतीने डायट घेत असतात. ज्याने त्यांची इम्युनिटी पावर कमी होते. जर निसर्गातील काही घटक आपल्या डाएटमध्ये घेतले तर आपली इम्युनिटी अजून वाढते,जसे मसाल्यांचे पदार्थ आले, लसुन, हळद ,दालचिनी, लवंग यामध्ये अँटीबॉडीज असतात जे बॅक्टेरिया किटाणू बुरशी यांना रोखण्यास मदत करतात. आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, लिंबूवर्गीय फळे जसे संत्रे, लिंबू, मोसंबी, आवळा यांचा समावेश नक्की करा. यामध्ये विटामिन c असते जे रोगप्रतिकारक शक्ती अजून वाढवत असतात. हे सर्व माझ्या customised  diet plan मध्ये असते.

4) शरीराला डिटॉक्स करणे-


इम्युनिटी वाढवण्यासाठी शरीराला वेळोवेळी डिटॉक्स करणे खूप गरजेचे असते. डिटॉक्स करण्याच्या  पद्धती वेगवेगळ्या आहेत. यामध्ये आपल्याला सहज करता येणारी म्हणजे डिटॉक्स वॉटर पिणे. आणि आठवड्यातून एकदा उपवास करणे ,किंवा दररोज 12 ते 16 तास उपवास करणे, कारण असे की आपण जे काही पदार्थ खातो ते पचण्यासाठी फळांना 3 तास,भाज्यांना 6 तास आणि धान्य कडधान्यांना 15 ते 18 तास असा वेळ लागतो.आणि तुम्ही विचार करा, याच्या आधीच आपण पुन्हा दुसरे मोठे मिल घेत असतो. याचा साईड इफेक्ट म्हणजे काही  न पचलेल्या भाग हा शरीरात सडायला लागतो ज्यामुळे आपल्याला ऍसिडिटी अपचन गॅस असा त्रास होतो त्यामुळे शरीराला डिटॉक्स करणे खूप महत्त्वाचे आहे.यासाठी उपवास हा खूप सोपा मार्ग आहे.

5) शरीराला चांगली झोप देणे-


झोप आपल्या शरीरात एक डॉक्टरां सारखे काम करत असते. जेव्हा आपण दिवसभर काम करतो आपल्या शरीराची तेव्हा झीज होत असते ,ते भरून काढण्याचे काम रात्री झोपेत होत असते. त्यामुळे योग्य टाईम मध्ये झोपणे खूप महत्त्वाचे आहे. चांगली झोप असेल तर रोगांची लढण्याची ताकद आपोआप वाढते.

हा ब्लॉग वाचल्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. ब्लॉग कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स मध्ये नक्की विचारू शकता. आणि अशाच महत्त्वाच्या टिप्स जर तुम्हाला पाहिजे असतील तर माझा फेसबुक ग्रुप मधुराज फिटनेस मोटिवेशन हा जॉईन करा.

Comments

  1. very nice Madhura.

    ReplyDelete
  2. खूपच छान मधुरा

    ReplyDelete
  3. खूप छान लिहिला आहे ब्लॉग मधुरा so nice

    ReplyDelete
  4. Khoop chan Madhura👌🏻👌🏻
    Keep it up 👍👍

    ReplyDelete
  5. Khup mast content Madhura . Keep it up 👏👏👏

    ReplyDelete
  6. Madhura, very nice information 👍👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

2021... नवीन वर्षात शरीराचे आरोग्य हीच खरी संपत्ती.

निसर्गाची किमया आणि........