निसर्गाची किमया आणि........
निसर्गाची किमया आणि नारळात पाणी खरंच कसे आले ते पाणी ? नारळ पाण्याचा आपल्या शरीरासाठी होणारे फायदे हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही.नारळ पाण्यात कित्येक पोषक तत्वांचा चांगला स्त्रोत आहे.अँटीऑक्सिडंट असते.मूत्रपिंडातील निर्माण होणार दगड रोखण्यास मदत करते.हृदयाचे आरोग्य सुधारते रक्तदाब कमी करते .दीर्घ व्यायामानंतर फायदेशीर असतो. नारळाच्या झाडांमध्ये प्रत्येक भागाचा पाने ,फळ माणसांना खूपच उपयोग होत असतो म्हणूनच त्याला कल्पवृक्ष म्हणतात. पण हे झाले नारळाचे निसर्गामध्ये अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्याचा आपण कधी विचारही करत नाही, जेव्हा न्यूट्रिशनिस्ट म्हणून आम्हाला प्रत्येक फळांचे भाज्यांचे आपल्या शरीराला होणारा उपयोग हे अभ्यासताना खूप कठीण आणि आठवायला त्रासदायक असायचे. हीच गोष्ट निसर्गाने अगदी खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे पण कधी विचार केलाय का, पूर्वीच्या काळी असे कॅलरीज मापायचे चार्ट होते का त्याप्रमाणे लोक डायट करायचे का आणि एवढे करूनही त्यांचे आयुष्यमान दीर्घ होते त्याचे कारण हे फक्त निसर्ग. माणसांच्या बुद्धीच्या पलीकडे निसर्गाने आपल्याला भरपूर दिले आहे तेही अगदी न मागता ...