Posts

Showing posts from October, 2021

लहान मुलांच्या खाण्याच्या हेल्दी सवयी लावण्यासाठी 4 महत्त्वाच्या टिप्स

Image
आजच्या बदलत्या जीवनशैलीनुसार लहान मुलांना चॉकलेट, बेकरी प्रॉडक्ट, कॅडबरी, आइस्क्रीम अशा गोड पदार्थ खाण्याच्या सवयी खूप लागतात. आणि मुले एवढी त्या पदार्थांच्या आहारी जातात की एखाद्या वेळेस जर त्यांना ते पदार्थ मिळाले नाही तर रडून उपाशी राहतात. यासाठीच आधी त्यांना त्या पदार्थांची सवय लावून न देणे हा एकच पर्याय असतो. एखाद्या वेळेस आपण हे पदार्थ दिले तरी चालेल, पण सारखे सारखे देणे म्हणजे, आपण त्यांच्या सवयींना खतपाणी घालत असतो,आणि नकळतपणे त्यांच्या आरोग्याची हेळसांड करत असतो. याची या मुलांच्या आई-वडिलांना जाणीवच होत नाही, आणि जेव्हा जाणीव होते तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते. मी मधुरा आंबेकर न्यूट्रिशनिस्ट आणि नॅचरलफिटनेसएक्सपर्ट Madhura's Fitness Motivation चैनल ची निर्माती.मला  डिसेंबर 2022 पर्यंत 10000 लोकांच्या फिटनेसमध्ये सकारात्मक बदल घडवून आणायचे आहेत. बदलत्या जीवनशैलीनुसार लहान मुलांच्या खाण्याच्या हेल्दी सवयी कशाप्रकारे लावू शकतो, हे मी  सांगणार आहे, त्यासाठी हा ब्लॉग पूर्ण वाचा.   तर मग चला जाणून घेऊया.... परिपूर्ण संतुलित आहार देणे  लहान मुलांमध्ये पोषणतत्वांच...