दिवाळी डायट मधील महत्वाचे 7 बदल ज्यामुळे वजन वाढणार नाही
या दिवाळीमध्ये लाडू स्वीट खायचे आहेत,आणि जास्त वजन ही वाढवायचे नाही, असे झाले तर किती छान.काही व्यक्ती डायट बद्दल खूपच काळजी करून दिवाळीचा आनंद घेत नाहीत. आणि काही तर त्यांचे उलट असतात.जास्तच जास्त स्वीट आणि फराळ खाऊन वजन आणि कोलेस्ट्रॉल वाढून घेतात. पण जर आपण दिवाळीमध्ये स्वीट ,फराळ खाताना थोडी काळजी घेतली तर आपले वजनही वाढणार नाही, आणि दिवाळी छान पैकी एन्जॉय करू.... नमस्कार, मी मधुरा आंबेकर न्यूट्रिशनिस्ट आणि नॅचरल फिटनेस एक्सपर्ट, मधुराज फिटनेस मोटिवेशन ची निर्माती. मला येत्या डिसेंबर 2021 पर्यंत 10000 लोकांच्या फिटनेस मध्ये सकारात्मक बदल घडवून आणायचा आहे. मी तुम्हाला दिवाळी मधील 7 आहारातील बदल सांगणार आहे ज्यामुळे आपले वजन वाढणार नाही आणि दिवाळी छान पैकी एन्जॉय करू. त्यासाठी माझा ब्लॉग पूर्ण वाचा. तर मग मग चला जाणून घेऊया ते 7 आहारातील बदल 1) दिवाळी फराळ किंवा स्वीट बाहेरून घेऊन खाऊ नका - दिवाळीमध्ये सर्वात पहिले म्हणजे आपण जे काही फराळ स्वीट्स खाणार आहोत ते शक्यतो घरात बनवलेले पाहिजे ,कारण बाहेरचे पदार्थ बनवताना कोणते तेल वापरले असेल, कोणते प्रिझर्वेटिव्ह...